मी एक object आहे, आणि हा समाज एक फोटोग्राफर...
एकदा आरशात पाहून घेतो, मग त्याच्यासमोर होतो सादर...
भीतीने त्याच्या जिथे तिथे मी, मेकअप करून जाई...
Scripted आयुष्य सारे, जणू wedding फोटोग्राफी...
सतत माझ्यावरती तो focus ठेऊन असतो...
जरा वेगळे वागलो कि लगेच फोटो काढतो...
मैत्रिणीला बागेत मी हळूच चोरून भेटतो...
तो रस्त्यात भेटला कि, बहीण म्हणून सांगतो...
नातेवाईकांच्या लग्नात हा माझेच फोटो काढतो...
वयात आलेल्या मुलीच्या आईला एक प्रत पाठवतो...
घरी येऊन मग बाबांना माझ्या बहिणींच्या copies दाखवतो...
त्याला हवा असलेला profile pic आईच्या डोक्यात भरवून जातो...
माझ्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो हाच काढतो...
मूल झाले नाही कि, सोनोग्राफीचे रिपोर्ट हि तोच काढतो...
मूल होत नाही म्हटल्यावर, एखादे निराधार पोर मी दत्तक आणतो...
तर सगळ्यांना आमंत्रण देत हा त्याच्याहि बारशाचे फोटो सेशन करतो...
पोरगं माझं नापास झालं कि त्याचं प्रगतीपत्रक फ्रेम करून हा display ला ठेवतो...
मुलीला बॉयफ्रेंड असला तर दोघांचे फोटो चक्क page3 वर छापतो...
तिने पळून लग्न केले कि, marriage कोर्टाबाहेर माझं मोठ्ठ होर्डिंग टांगतो...
सगळं सुरळीत असलं तरी, खिडकीत येऊन CCTV लावून पाहतो...
म्हणून मी खिशामधे एक फेसपॅक नेहमी बाळगून असतो...
तो दिसला कि चेहरा धुवून त्यावर एक खोटी smile आणतो...
तरीही त्याला काहीतरी भानगड असल्याचा संशय येतो...
पुढल्यावेळी मी डोक्यात हॅट आणि डोळ्यावर गॉगल लावून जातो...
पण कितीदिवस जगणार असं portfolio चं आयुष्य विचित्र?...
एक फोटोग्राफर ठरवेल कसं असेल तुझ्या आयुष्याचं छायाचित्र?
फ्लॅश ची पर्वा न करता, एकदा जग wildlife फोटोग्राफीचं आयुष्य स्वतःसाठी...
साऱ्या जगाचे कॅमेरे तासनतास आस लावून असतील, तुझी एक छबी टिपण्यासाठी...
~ अरुण भऊड