तरीही Beer बार मध्ये, होती तुडुंब भरली गर्दी…
लपत-छपत जात, कोपऱ्यातली जागा शोधायची होती
भीतभीतच शिरलो आत, मला थोडीशीच घ्यायची होती…
आधी नुसतीच तंदूरी मागवून, खात्री करून घेतली
आपल्या ओळखीची कुणी व्यक्ती, आसपास नव्हती…
उगीचच MENU चाळत मी, काही मिनिटे घालवली
वेटरला हळूच इशारा करत, मी पण एक बियर मागवली…
कित्येक झिंगलेल्या टेबलावर, एक हशा पिकला होता
कुठल्यातरी कोपऱ्यात कुणी, एकटाच टिकला होता…
कुणी घालत होते हुज्जत, एकाने तर आदळलीच बाटली
दारूड्यांच्या गराड्यात एकट्याने, माझी थोडी तरी फाटलीच…
झींगाट टेबलावरल्या भांडणात, माझी खुर्ची जराशी सरकली
इतक्यात माझ्या पुढ्यात बियर, ग्लासामध्ये फ़सफ़सली…
डोळे मिटून शांतपणे, जेव्हा घोट पहिला गळी उतरवला
दिवस भराचा शीण सारा, पार एका झटक्यात उतरला…
घोटामागून घेतले घोट, सोबतीला होती शेंगदाण्याची वाटी
साऱ्या बारची जनता भासे, जणू राबतेय माझ्याच साठी…
भीती पुरती चेपली होती, अख्खी बियर केली मी फस्त
'वेटर, एक बोतल और लाओ' मला वाटतंय आता मस्त…
विमान उडाले पुरते हवेत, कानांना आता बसले दडे
देवा शपथ सांगतो यावेळेस, फोन नको लाऊस गडे…
खुर्ची वरून उठत तिनदा, सारा बार भटकून आलो
हमरीतुमरी च्या टेबलावर, चक्क settlement करून आलो…
आख्खा खंबा रीझवला की काय लागते भांडण मिटवायला
क्लासिक माईल्ड दिली कि senti होत, लागतो समोरचाच रडायला…
शेवटी वेटर बिल तरी आणतो, नाहीतर सगळ्या लाईटि घालवतो
नाईलाजने मग बियर बारचा मी, जड पावलांनी निरोप घेतो…
डोळे ताणत, तोल सावरीत मी शोधत फिरतो मग माझी वस्ती
रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांची, आता कसलीच उरली नसते धास्ती…
बेल वाजवून दारावरची, मी तडक आत शिरतो
खूप दमलोय म्हणत बिछान्यावर जाऊन पडतो…
दारूच्या नशेत का होईना, मी माझ्या भावविश्वात रमतो
रोजचाच प्रश्ण माझ्यासाठी आज रात्रीपुरता तरी संपतो…
~ अरुण भऊड
No comments:
Post a Comment