अन हाती कथलाचा वाळा |
तरी सुरक्षित अंतर पाळा,
अन या कोरोनाला टाळा ||
गरज असेल तेव्हाच पडा बाहेर,
घराला लावून टाळा |
बाहेर पडल्यावर, तोंडावरल्या मास्कशी,
करू नका चाळा ||
हात धुताना २० सेकंदाची,
वेळ चोख पाळा |
अन्यथा कोरोनाला तुमचा,
लागलाच समजा लळा ||
गुरं ढोरं पाळा, कुत्रा पाळा, मांजर पाळा,
हवं तर एखादं गाढव पाळा |
पण ब्रेकिंग न्यूज अन व्हाट्सअँप पाहणं,
तेवढं मात्र टाळा ||
"कोरोना माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही",
हा फाजील आत्मविश्वास टाळा |
"साऱ्या विश्वाच्या नरडीचा घोट घेईल का हा कोरोना?"
ही अवास्तव भीती देखील टाळा ||
जात-पात, धर्म, अन ते राजकारण पहिलं टाळा |
फक्त आणि फक्त 'मानवजात' पाळा, 'मानवजात' पाळा ||
प्रत्यक्ष भेटीगाठींना जरी आता सरकारने घातलाय आळा |
मनात मात्र राहू दे, तोच पूर्वीचा जिव्हाळा, तोच पूर्वीचा जिव्हाळा ||
~ अरुण भऊड