dp मधली तू,
जागची कधी हलत नाहीस...
भेटलो प्रत्यक्ष कि कशी,
एका जागी स्थिर बसत नाहीस...
कितीही धाडलेस selfie,
तरी मन माझे भरत नाही...
कुठल्याच फोटोमधे,
तुझ्या केसाची बट उडत नाही...
फोनवर तासनतास,
बोलण्यात कसलीच मजा नाही...
दुरून दिसलीस जरी येताना,
तुझा चेहराच सारं सांगून जाई...
सतराशे साठ व्हाट्सअँप icon,
कुठला पाठवू समजत नाही...
तुझ्या कवेतला आनंद,
कुठल्याच smileyत दिसत नाही...
व्हाट्सअँप अथवा skype,
कशातच ती feeling नाही...
तुला एकदातरी पाहिल्याशिवाय,
काळजाचा ठोका चुकत नाही...
Status वरून व्हाट्सअँपच्या,
मनातले काही कळत नाही...
पाणावलेल्या डोळ्यात तुझ्या,
कुठलेच भाव लपत नाहीत...
~ अरुण भऊड