Friday, June 24, 2016

काचा

दूरच्या प्रवासाला निघालेल्या,
बसच्या खिडकीच्या काचा...
काचेबाहेर एक प्रतिमा,
स्मित हास्याने हाथ हलवून निरोप देत असते...
काचेपलीकडले स्पष्ट दिसते,
तरी मनापालिकडले भाव लपलेलेच...
गाडी सुटते आणि ती,
लहान होत काचेवरला एक ठिपका होते...
तिच्या आठवणीने,
काचेतून वाऱ्याची एक थंड झुळूक येते...
ढगांचाही कंठ दाटून येतो अन,
खिडकीच्या काचा टचकन ओल्या होतात...
खिडकीवर डोके ठेवताच,
तिच्या कुशीतली उब काचेवर पसरते...
नकळत माझ्या बोटांतून,
तिच्या नावाची नक्षी काचभर उमटते...

No comments:

Post a Comment