नववधू प्रिया मी बावरते, पाऊल नखाशी घुटमळते ।
मग हाती पाहूनी हात तुझा, सप्तपदी मी प्रारंभते ।।
आयुष्यातील वळण नवे, ह्या वळणावरती अडखळते ।
घेत तुझा 'आधार' नवा, मी पहिले पाऊल सावरते ।।
हे पर्व नवे, प्रवास नवा हा, कुणी प्रवाशी मी शोधिते ।
द्रुढ 'मैत्री'चा घेत हाथ तुझा, मी दुसरे पाऊल टाकिते ।।
नसता मी कधी, कुणी होईल कासाविस का ते मी आठवते ।
'करशील तू काळजी माझी' घेत वचन मी तिसरे पाऊल ठेविते ।।
रात्री उशिरा येताना घरी, कधी चुकेल बस अन भर पावसात मी सापडते ।
नसेल battery, पण असेल ना 'विश्वास'? विचारित तुला मी चौथे पाऊल उचलते ।।
कितीही केले कष्ट, वेचले जीवन, तरी हे जग कस्पटासमान वागवते ।
थोडीशी 'कदर' अन थोडा 'आदर' मागते तुला मी पाचवे पाऊल उमटते ।।
माझ्याही हातून कधी घडतील चुका, त्यांची देत कबुली मी वरमते ।
तुही मोठया मनाने मग करशील ना 'क्षमा' सहावे पद हे डळमळते ।।
पिंजऱ्यातील पक्षाला जरी मिळाले दाणे, जीवन त्याचे किती कोंदट ते ।
टाकते पाऊल 'स्वातंत्र्याचे' घेत भरारी तुझ्यासवे, हि सप्तपदी मी संपवते ।।
प्रेम-प्रेम म्हणजे काय असते, ते नाही दिलेस तरी चालेल, तू दिलेली हि सप्तपदीच मनी मी साठवते ।
'प्रेम' म्हणजे तरी 'आधार, मैत्री, काळजी, विश्वास, आदर, क्षमा नि स्वातंत्र्य' याहुन वेगळे ते काय असते ।।
~ अरुण भऊड

No comments:
Post a Comment