Wednesday, March 8, 2023

होळी

आज सकाळी लवकर उठलो...
आळसा ची होळी करत.
चक्क जॉगिंग करून आलो...
सुस्तपणाची होळी परत!

ऑफिसात कधी नव्हे ते वेळेवर पोहोचलो,
उशिरा जाण्याची होळी करत.
प्रामाणिक पणे केले दिवसभराचे काम,
कामचुकार पणाची होळी करत!

माझ्या टीम ला केले मी स्वीट चे वाटप,
कंजूसपणाची होळी करत!
निघताना कालिग्सना दिली एक गोड स्माईल,
तिरस्काराची होळी परत...

ट्राफिकचे सगळे सिग्नल पाळीत घरी आलो,
बेशिस्त पणाची होळी करत...
लिफ्ट मधे जोशी काकांना आधी जाऊ दिले,
अनादराची होळी another...

बायको आणि माझ्या साठी चहा मीच केला,
पुरुषी पणाची होळी करत...
कधीकाळी आज मुलीचा अभ्यास घेतला,
बेजबाबदार पणाची होळी परत...

सोसायटीच्या होळीच्या पाया पडून आलो,
कुसंस्काराची होळी करत...
घरी आई बाबांच्या ही पाया पडलो,
वाईट शिष्टाचाराची होळी परत...

होळी रे होळी म्हणत, केली पुरणाची पोळी
दुसऱ्या दिवशी घेतली पुन्हा, भांगाची गोळी...
समाजाच्या खऱ्या रंगांची उधळण झाली परत
बिअर टाकून पुन्हा मी, पडलो गटारात लोळत...

~ अरुण भऊड



No comments:

Post a Comment